आर्थिक प्रगतीसाठी सहिष्णुता आवश्यक
आर्थिक प्रगती, सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रश्न विचारणे आणि पर्यायी दृष्टिकोन मांडणे यांतच नवीन संकल्पनांचा उगम असतो. म्हणूनच भारताला आर्थिक प्रगती करायची असेल तर येथील समाजजीवनात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. देशाच्या आर्थिक विकासाची सहिष्णुता ही पूर्वअट आहे. एकविसाव्या शतकात मानाने जगायचे असेल तर आपल्याला आपल्या परंपरेतील विमर्श व खुली चिकित्सा ह्या प्राणतत्त्वांची जोपासना करावी लागेल. …